नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत हिरे व्यापारी नीरव मोदी याने केलेल्या १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने या बँकेच्या संजीव शरण आणि के. वीर ब्रह्माजी राव या दोन कार्यकारी संचालकांना पदावरून दूर केले आहे. बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत ‘स्विफ्ट’ यंत्रणेचा दुरुपयोग करून हा घोटाळा केला गेला होता. बँकेच्या कारभारावर योग्य नियंत्रण न ठेवल्याबद्दल शरण व राव यांना बडतर्फ केले गेले. अशा घोटाळ्यात राष्ट्रीयीकृत बँकेतील कार्यकारी संचालकांवर बडगा उगारला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पीएनबीचे दोन कार्यकारी संचालक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 06:19 IST