Join us  

Punjab National Bank : तुमच्याकडे PNB चे कार्ड असेल तर मिळेल 2 लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 3:54 PM

PNB Rupay Platinum Debit Card : या कार्डच्या फायद्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.rupay.co.in/our cards/rupay debit/rupay platinum या लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला या कार्डवरील सर्व ऑफर्सची माहिती मिळेल.

नवी दिल्ली : ज्यांचे पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) खाते आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांचा फायदा देत आहे. यासह, आपल्याला अनेक विशेष फायदे देखील मिळतील. दरम्यान, बँक तुम्हाला पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर (PNB Rupay Platinum Debit Card) हा लाभ देत आहे.  (PNB Rupay Platinum Debit Card give 2 lakh rupees benefits)

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. RuPay Platinum Debit Card मध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही या ऑफरचा आणि या कार्डाचा त्वरित लाभ घ्या.

PNB RuPay Platinum Debit Card चे फायदे>> अॅमेझॉन, स्विगी ऑफर.>> फ्री एअरपोर्ट लॉज असिस.>> 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळेल.>> 24 तास concierge सुविधा मिळेल.>> 300 पेक्षा जास्त मर्चेंट ऑफर्स मिळतील.

कार्डच्या माहितीसाठी...या कार्डच्या फायद्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.rupay.co.in/our cards/rupay debit/rupay platinum या लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला या कार्डवरील सर्व ऑफर्सची माहिती मिळेल.

अनेक प्रकारचे मिळतात कार्ड्सबँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड्स दिले जातात. याशिवाय, बँकेकडून रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड देखील दिले जाते, ज्यामध्ये तुम्हाला आरोग्य तपासणी पॅकेज, अपघाती विमा, घरगुती आणि आंतरराष्ट्रीय लाउंज कार्यक्रम आणि खरेदीसह कॅशबॅकसह अनेक सुविधा मिळतील. या कार्डमध्ये तुम्हाला संपूर्ण 10 लाख रुपयांचा लाभ मिळेल. 

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकबँकव्यवसाय