Join us  

पीएनबी बँक घोटाळा : बँकेच्या कर्जाची भरपाई करण्यास तयार; चोक्सीचा न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:46 AM

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळाप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी याने आपली कंपनी गीतांजली जेम्सला आजही ग्राहकांकडून ८ हजार कोटी रुपये येणे आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळाप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी याने आपली कंपनी गीतांजली जेम्सला आजही ग्राहकांकडून ८ हजार कोटी रुपये येणे आहे. हे येणे आल्यास बँकेचे सर्व कर्ज फेडू शकू. त्यामुळे कंपनी जप्त करू नये, अशी विनंती करणारा अर्ज शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयात केला.पीएनबी घोटाळाप्रकरणी खुद्द सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अँटिग्वाला येऊन चौकशी करावी, तसेच प्रकृती ठीक होईपर्यंत आपल्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात सादर करावे, अशीही विनंती त्याने केली. जप्त न केलेली मात्र मार्केटमध्ये विकता येण्याजोगी संपत्ती व फर्म ईडीला ताब्यात न घेण्याचे निर्देश द्यावेत, असे अर्जात म्हटले. गीता जेम्सला ग्राहकांकडून ८,५६७ कोटी येणे होते. बँक कर्जाची रक्कम ६,०९७.६३ कोटी आहे. गुन्हा नोंदविल्याने मी ती ग्राहकांकडून वसूल करू शकत नाही, असे चोक्सीने अर्जात म्हटले. या अर्जावर १० आॅक्टोबर रोजी सुनावणी आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा