Join us  

इंटरनेट स्पीड प्रचंड वाढणार; ५ जीसोबतच ६ जीही येणार! पंतप्रधान मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 8:48 AM

भारतात ६जी दूरसंचार सेवा सुरू होऊन, ४५० अब्ज डॉलरचे ५जीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेस योगदान मिळेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : या दशकाच्या अखेरपर्यंत भारतात ६जी दूरसंचार सेवा सुरू होऊ शकेल. त्या दिशेने एका कृती दलाने काम सुरू केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी यांनी म्हटले की, ३जी आणि ४ जी सेवा देणाऱ्या दूरसंचार कंपन्या आगामी काही महिन्यांत ५जी सेवा देण्यास सुरुवात करतील.

४५० अब्ज डॉलरचे आगामी दीड दशकात ५जीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेस योगदान मिळेल. ८ संस्थांद्वारे विकसित केलेल्या ५जी टेस्ट बेडचा शुभारंभ करत माेदींनी म्हटले की, मला ५जी टेस्ट बेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली. दूरसंचार क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले हे  महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 

टॅग्स :केंद्र सरकार