Join us

व्यावसायिक वातावरण सुलभ करण्यास भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 00:04 IST

अवघे जग मोठ्या भरवशाने भारतासोबत भागीदारी करू पाहत असून, ही सुवर्णसंधी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अवघे जग मोठ्या भरवशाने भारतासोबत भागीदारी करू पाहत असून, ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व राज्यांनी जास्तीतजास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक वातावरण अधिक सुलभ करण्यास प्राधान्य द्यावे, सोबतच सरकारी कारभारात सुधारणा करण्यासह योजनांतील उणिवा दूर करण्यासाठी ‘आधार’चा जास्तीतजास्त वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘राज्य म्हणजे भारताच्या परिवर्तन प्रक्रियेतील साधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा भाग म्हणून मोदी यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधला. अशा बैठकीला मोदी यांनी मार्गदर्शन करण्याची पहिलीच वेळ होय. निति आयोगाच्या वतीने आयोजित या बैठकीत ते दोन तास होते. राज्यांतील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ द्यावा, जेणेकरून त्यांना नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची कल्पना येईल, असेही पंतप्रधानांनी मुख्य सचिवांना सांगितले आहे.