Join us  

प्लास्टोतर्फे ‘सॉफ्ट क्लोज टॉयलेट सीट कव्हर’ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:08 AM

पाण्याच्या टाक्या आणि पाईप्स उत्पादनात भारतात आघाडीच्या आर सी प्लास्टो टँक व पाईप्स प्रा. लिमिटेडने अलीकडेच ‘सॉफ्ट क्लोज टॉयलेट सीट कव्हर’ ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे.

नागपूर : पाण्याच्या टाक्या आणि पाईप्स उत्पादनात भारतात आघाडीच्या आर सी प्लास्टो टँक व पाईप्स प्रा. लिमिटेडने अलीकडेच ‘सॉफ्ट क्लोज टॉयलेट सीट कव्हर’ ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे. सॉफ्ट क्लोज टॉयलेट सीट कव्हर जेट व जेटशिवाय दोन प्रकारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्राहकांना जेटशी संबंधित सर्व वस्तू मिळतात आणि दुसरे उत्पादन जेटशिवाय आहे. या उत्पादनाची उभारणी करणे अत्यंत सोपे आाहे आणि प्रत्येक बॉक्ससह वापरकर्त्यांसाठी पुस्तिकादेखील आहे. या मऊ क्लोज टॉयलेट सीट कव्हरमध्ये चार मार्गाच्या अ‍ॅडजस्टमेंट सुविधा असून हे उत्पादन मानक आकारांसह पांढऱ्या आणि आयव्हरी रंगात उपलब्ध आहे. हे पूर्णपणे हायजेनिक आहे आणि पीपी मटेरियलने बनविलेले आहे. या उत्पादनाचे आयुष्य दीर्घकाळ आहे. हे सीट कव्हर वापरकर्त्यांसाठी अनुकूल आणि देखरेखीसाठी सोपे आहे. दर्जेदार पाणी साठवण टाक्या व पाईप्स तयार करण्याव्यतिरिक्त आर सी प्लास्टो टँक्स व पाईप्स प्रा. लिमिटेड सीपीव्हीसी आणि यूपीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज, एसडब्ल्यूआर आणि कृषी पाईप्स व फिटिंग्ज, कॉलम पाईप्स, गार्डन पाईप्स, सीएम व सीएस पाईप्स, एचडीपीई पाईप्स आणि स्प्रिंकल पाईप्सची निर्मिती करते. कंपनीने १० हजार लिटरची तीन थराची वॉटर स्टोरेज टँक बाजारात आणली आहे.