Join us

बावडा पॅव्हेलियन मैदानावर परत वृक्षारोपणाची गरज

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

कसबा बावडा : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाच्या भोवती करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील काही झाडे जगलेली नाहीत त्याठिकाणी नवीन झाडांचे रोपण महापालिकेने करावे, अशी मागणी कसबा बावड्यातील क्रीडाप्रेमींतून होऊ लागली आहे.

बावडा पॅव्हेलियन मैदानाच्या सभोवती काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. ही झाडे पाणी घालून खते जगविण्याचा प्रयत्न क्रीडाप्रेमींतून होत आहे. काही झाडे चांगल्याप्रकारे वाढून त्याचे डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. काही झाडे मात्र वाळून गेली आहेत. काही झाडांची वाढ खुंटली आहे. ज्या ठिकाणची झाडे जगलेली नाहीत त्या ठिकाणी पुन्हा नवीन झाडे लावल्यास पॅव्हेलियन मैदानावर हिरवाई दिसेल.
बावड्यातील नगरसेवक पॅव्हेलियन मैदानावर विविध स्पर्धांच्या उद्घाटनाला कार्यक्रमाला येत असतात; परंतु त्यांची नजर अशा झाडांकडे कशी जात नाही, असा प्रश्न क्रीडाप्रेमींतून पडतो. पुढील महिन्यात (डिसेंबर) या मैदानावर विविध स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बावड्यातील नगरसेवकांनी ज्या खड्ड्यात झाड उगवले नाही अशा खड्ड्यात पुन्हा क्रीडाप्रेमींच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घ्यावी आणि मैदानाभोवतीचा परिसर हिरवागार करावा, अशी मागणी होत आहे.