सपकाळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात प्लेसमेंट सेंटरची सुविधा
By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST
नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट, सपकाळ नॉलेज हब संचलित आर. जी. सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी अंजनेरी, नाशिक या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत प्लेसमेंट सेंटरला मान्यता व अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे.
सपकाळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात प्लेसमेंट सेंटरची सुविधा
नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट, सपकाळ नॉलेज हब संचलित आर. जी. सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी अंजनेरी, नाशिक या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत प्लेसमेंट सेंटरला मान्यता व अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील बी.फार्मसी व एम. फार्मसीचे विद्यार्थी प्लेसमेंट सेंटरद्वारे विविध औषधी कंपन्यांमध्ये नोकरी संदर्भातील मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेच्या युगात स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी विविध मान्यवरांचे प्लेसमेंट सेंटरद्वारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. सातपूर, अंबड, सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरातील तसेच देशातील विविध औषधीकंपन्या सपकाळ फार्मसी महाविद्यालयात प्लेसमेंट अंतर्गत मुलाखतीचे आयोजन करणार आहेत. त्यामुळे फार्मसीच्या इच्छुक उमेदवारांनी/विद्यार्थ्यांनी सदर प्लेसमेंट सेंटरचा फायदा घ्यावा, असे आवाहन सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन रवींद्र जी. सपकाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माधवदेव सारस्वत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. सौदागर यांनी केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)