Join us  

PAN अपडेट केलं नाही तर बंद होणार SBI अकाउंट? सरकारनं ग्राहकांना दिली मोठी माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 4:18 PM

लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फॅक्ट चेक ट्विटर हँडल चालविले जात आहे. हे अशा प्रकारच्या लिंक व्हेरिफाय करते आणि त्याची सत्यता पडताळून सांगते.

देशात डिजिटलायझेशन वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. याशिवाय फेक न्यूजही मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहेत. आजकाल, मोबाईल किंवा ई-मेलवर अशा अनेक लिंक्स आणि बातम्या येत असतात, ज्यांबद्दल आपल्या अपडेट राहणेही आवश्यक आहे. मात्र, अनेकवेळा आपण माहितीच्या अभावाने चुकीच्या लिंकवर क्लिक करतो, यामुळे अनेक वेळा आपले नुकसान होण्याचीही शक्यता असते.

PAN नंबर अपडेट करण्यास सांगितले जात आहे... -लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फॅक्ट चेक ट्विटर हँडल चालविले जात आहे. हे अशा प्रकारच्या लिंक व्हेरिफाय करते आणि त्याची सत्यता पडताळून सांगते. गेल्याकाही दिवसांपासून लोकांना एसबीआय (SBI)च्या नावे मेसेज येत असल्याचे बोलले जात आहे. या मेसेजमध्ये खाते धारकांना PAN नंबर अपडेट करण्यास सांगितले जात आहे.

काय आहे मेसेजमध्ये? -पीआयबी फॅक्ट चेककडून ट्विटर हँडलच्या माध्यमाने सांगण्यात आले आहे, की एसबीआयच्या (SBI) नावाने ग्राहकांना एक मेसेज पाठविला जात आहे. यात PAN अपडेट करण्यास सांगण्यात येत आहे. तसेच, PAN अपडेट केले नाही, तर अकाउंट ब्‍लॉक होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचे ई-मेल आणि एसएमएसला कधीही उत्तर देऊ नये. येथे बँक ग्राहकांना जागरुक करत बँक आपले पर्सनल आणि बँकिंग ड‍िटेल्स एसएमएसवर कदीही मागवत नाही, असे पीआयबी फॅक्ट चेककडून येथे सांगण्यात आले आहे.

काय आहे PIB फॅक्ट चेक? -पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) सोशल मीडियावर व्हायरल होणारे फेक मेसेज अथवा पोस्ट समोर आणंत लोकांना जागरूक करत असते. याच बरोबर यावरून फेक न्यूज संदर्भातही माहिती दिली जाते. याशिवाय, सरकारी योजनांसंदर्भात चुकीच्या माहितीचे सत्य समोर आणत असते. जर आपल्याला एखाद्या व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर आपण 918799711259 वर अथवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता. 

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियासरकारएसएमएस