नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात (२०१४-१५) ७९ हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे. ही वाढ १४ टक्के असेल, असा अंदाज आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या देशभरातील ५ कोटींहून अधिक सदस्यांकडून २०१३-१४ या वर्षात ७१,१९५ कोटी मिळाले आहेत. २०१२-१३ मध्ये सदस्यांकडून ६१,१४३ कोटी रुपये मिळाले होते. चालू आर्थिक वर्षात ७९,३७७ कोटी रुपयांपैकी ५९,३४६ कोटी रुपये पीएफ योगदानाच्या रूपात, तर १९ हजार कोटी रुपये पेन्शन आणि १,०३१ कोटी रुपये ‘डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेच्या रुपयात मिळतील, असा केंद्रीय विश्वस्त मंडळाचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}