Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पेट्रोल महागणार

By admin | Updated: March 8, 2016 21:52 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्याचे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले आहेत

पणजी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्याचे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे गोव्यात पेट्रोल महाग होणे अटळ आहे. पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, १६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर वाढविण्यात आला तरी त्याचा जनतेवर फारसा परिणाम होणार नाही.