Join us  

13 ऑक्टोबरचा प्रस्तावित संप पेट्रोल पंपचालकांनी घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 4:49 PM

13 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला देशव्यापी संप पेट्रोल पंपचालकांनी मागे घेतला आहे.

नवी दिल्ली - 13 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला देशव्यापी संप पेट्रोल पंपचालकांनी मागे घेतला आहे. बुधवारी दुपारी पेट्रोल पंपचालकांच्या संघटनांकडून हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पेट्रोल व डिझेलच्या डीलर्सच्या द फेडरेशन आॅफ आॅल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स, द आॅल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, सीआयपीडी या तीन संघटनांनी एकत्रित येत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १३ आॅक्टोबरला एक दिवसीय संपाची हाक दिली होती. मात्र महाराष्ट्रातील संपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

पेट्रोल पंपचालकांच्या (डीलर्स) विविध मागण्या मान्य करूनही अवास्तव मागण्यांसाठी संप केल्यास डीलर्सवर कारवाई करण्याचा इशारा इंडियन आॅइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीनही तेल कंपन्यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत दिला होता. सामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा डीलर्सनी चर्चेने प्रश्न सोडवण्याचे आवाहनही इंडियन आॅइलचे वितरण विभागाचे संचालक बलविंदर सिंग कांत यांनी केले होते. 

पेट्रोल व डिझेलच्या डीलर्सच्या द फेडरेशन आॅफ आॅल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स, द आॅल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, सीआयपीडी या तीन संघटनांनी एकत्रित येत १३ आॅक्टोबरला एक दिवसीय, तर २७ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली होती. एमडीजी नियमावली काय सांगते?पेट्रोल पंपावरील कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे लागणार. त्याचा परतावा पंपचालकांना तेल कंपन्यांकडून केला जाईल. पेट्रोल व डिझेल वितरण करणाºया नोझलची रोज तपासणी करावी. जेणेकरून ग्राहकांची लूट होणार नाही.घरपोच पेट्रोल विचाराधीन-बदलत्या काळानुसार ग्राहकांना पेट्रोलियम पदार्थ घरपोच देण्याची संकल्पना विचाराधीन असल्याचे कांत यांनी सांगितले. ग्राहकांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव पेट्रोलियम एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी आॅर्गनायझेशन (पेसो) कडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे.

 

 

टॅग्स :पेट्रोल पंप