Join us  

पेट्रोल ८८ तर डिझेल ७६ रुपयांवर; सरकारला महागाईची नाही पर्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 3:08 AM

सरकारी तेल कंपन्यांनी सलग १३ दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली व बुधवारी दर स्थिर ठेवले. त्यामुळे आता दर कमी होतील, अशी आशा होती.

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सलग १३ दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली व बुधवारी दर स्थिर ठेवले. त्यामुळे आता दर कमी होतील, अशी आशा होती. पण महागाईची पर्वा न करता पुन्हा गुरुवारी पुन्हा पेट्रोल २० व डिझेलच्या दरात २२ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली. यामुळे इंधनाच्या दरांनी पुन्हा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारीही पेट्रोल ४८ तर डिझेल ५३ पैशांनी महागेल, असा अंदाज आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण पुढे करीत तेल कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे. यामुळे राज्यात पेट्रोलचे दर सरासरी ८७.२५ व डिझेलचे दर सरासरी ७५.१९ रुपये झाले आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी पेट्रोल ८८ व डिझेल ७६ रुपये प्रति लिटरच्या जवळ गेले आहे. मागील महिनाभरात पेट्रोल २.९५ व डिझेल ३.६४ रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. गेल्या १५ दिवसांतच पेट्रोल १.८२ व डिझेल ३.०५ रुपयांनी महागले. इंधन दरवाढीने मालवाहतूक महागल्याने लोक त्रासले आहेत.

टॅग्स :पेट्रोल