Join us  

पेट्रोल दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 100 पार; देशात शंभरी गाठणारे पहिले महानगर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 3:43 PM

मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे.

मुंबई- देशात शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने मुंबईमध्येपेट्रोल शंभरी पार गेले आहे. यामुळे आता मुंबई हे पेट्रोल दरवाढीची शंभरी गाठणारे देशातील पहिले महानगर ठरले आहे. (Petrol price hike; Petrol crosses 100 in Mumbai)

सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. डिझेलच्या दरात २८ पैसे तर पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात दररोज सकाळी ६ वाजता बदल होतो. पेट्रोल डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर खर्च एकत्र करून इंधनदर दुप्पट होतात.

Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दरशहर -   डिझेल दर       पेट्रोल दरदिल्ली-    ८४.८९        ९३.९४मुंबई-    ९२.१७         १००.१९कोलकाता- ८७.७४        ९३.९७चेन्नई-    ८९.६५        ९५.५१

टॅग्स :पेट्रोलडिझेलमुंबई