ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - आज मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पेट्रोलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये २ पैशांची कपात करण्यात आली आहे, मात्र डिझेलच्या दरात प्रतिलिटर १ रुपये ४७ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात करण्यात आली असून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर १ मार्चपासून लागू होणार आहेत. म्हणजेच नवीन दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.