Join us

पेट्रोल-डिङोल आणखी स्वस्त होणार

By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST

तेल कंपन्यांच्या दर आढावा बैठकीत पेट्रोल व डिङोल या दोन्ही इंधनाच्या किमतीत प्रति लिटर किमान 1 रुपयांची कपात होण्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा घसरणीचा कल कामय राहिल्याच्या पाश्र्वभूमीवर येत्या शनिवारी होणा:या तेल कंपन्यांच्या दर आढावा बैठकीत पेट्रोल व डिङोल या दोन्ही इंधनाच्या किमतीत प्रति लिटर किमान 1 रुपयांची कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. ही दरकपात झाल्यास पेट्रोलच्या दरातील ही सातवी दरकपात ठरेल, तर डिङोलच्या दरातील तिसरी दरकपात ठरणार आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असून, तेलाच्या किमतीने दोन आठवडय़ांपूर्वी प्रति बॅरल 8क् डॉलरचा नीचांक गाठला व त्यानंतर सातत्याने 8क् ते 82 डॉलरच्या आसपास किमती स्थिरावल्या आहेत. एकीकडे तेलाच्या किमती स्थिरावलेल्या असतानाच दुसरीकडे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाही 6क् ते 61 रुपयांच्या दरम्यान स्थिरावला आहे. 
परिणामी, तेल कंपन्यांच्या आयात खर्चात बचत होत आहे. त्यातच पेट्रोल पाठोपाठ आता डिङोलच्या किमतीही सरकारी नियंत्रणातून मुक्त झाल्याने व त्यांची सांगड आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांशी घातल्याने देशात इंधनाच्या किमती कमी होत आहेत. येत्या शनिवारी होणा:या आढावा बैठकीत तेलाच्या दराचा आढावा घेण्यासाठी जो किमतीचा संदर्भ घेतला जाईल, त्यात आंतरराष्ट्रीय दराची पातळी ही 8क् ते 82 डॉलरच्या दरम्यान असल्याने देशात पेट्रोल व डिङोलची किंमत कमी करण्यास वाव असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांच्या आढावा बैठकीत पेट्रोलच्या किमती प्रति लीटर 2 रुपये 41 पैशांनी कमी झाल्या होत्या तर डिङोलच्या किमती प्रति लीटर सव्वा दोन रुपयांनी कमी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
 
4आजवर कच्च तेलाच्या आयातील अमेरिका हा पहिल्या क्रमांकाचा देश होता. तेलाकरिता अमेरिका संपूर्णपणो आखाती देशांवर अवलंबून होता. परंतु, अमेरिकेला आता स्वत:चे तेलाचे साठे सापडले असून त्यातून उत्पादनासही काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. 
 
4डिसेंबर 2क्15 र्पयत अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल. मात्र, अमेरिका स्वयंपूर्ण झाल्यानंतर ‘ओपेक’च्या माध्यमातून तेलाच्या किमतीत अस्थिरता निर्माण करून तेल विकत घेण्यासाठी अनेक देशांवर ‘दबाव’ टाकू शकते.
4या शक्यतेने आखाती देशांनी गेल्या तीन महिन्यांपासून मागणीपेक्षा पुरवठा वाढविला आहे.
 
4आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यानंतर देशात आतार्पयत पेट्रोलच्या दरात 13 टक्क्यांची घट होत, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पेट्रोल 9 रुपये 36 पैशांनी कमी झाले आहेत, तर डिङोलच्या किमती 1क् टक्क्यांनी कमी होत डिङोल 5 रुपये 62 पैशांनी स्वस्त झाले आहे. जून 2क्1क् मध्ये तत्कालीन संपुआ सरकारने पेट्रोलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्या होत्या, तर गेल्या महिन्यात डिङोलच्या किमती नियंत्रणातून मुक्त केल्या. 
 
4मागणीपेक्षा पुरवठा जास्त करण्याची रणनीती किमान वर्षभर कायम ठेवण्याची या देशांची तयारी आहे. त्यामुळे इंधनाच्या किमती घसरत आहेत. 
4परिणामी, अमेरिकेचे उत्पादन पूर्णपणो दर नियंत्रण शक्य होईल व आखाती देशांकडून असलेली तेलाची मागणीही कायम राहील, अशी एकूण रणनीती असल्याचे विश्लेषण आंतरराष्ट्रीय तेल विषयक अभ्यासक डॉ. चंद्रा कृष्णमूर्ती यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.