Join us  

पेट्रोल-डिझेल दोन महिन्यांच्या उच्चांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 5:34 AM

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या असतानाही सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढून दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेले.

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या असतानाही सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढून दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेले. दिल्लीत पेट्रोल ७७.४९ रुपये लीटर झाले. ७ जूननंतरचा हा उच्चांक ठरला. मुंबई आणि चेन्नईत पेट्रोल अनुक्रमे ८४.९१ रुपये लीटर आणि ८०.५० रुपये लीटर झाले. कोलकात्यात ८०.४३ रुपये लीटरचा भाव राहिला.डिझेलचा दर दिल्लीत ६९.०४ रुपये लीटर राहिला. हा ३ जूननंतरचा उच्चांक ठरला. डिझेल मुंबईत ७३.३० रुपये, चेन्नईत ७२.९३ रुपये, कोलकात्यात ७१.८८ रुपये लीटर राहिले. पेट्रोलच्या दरात ९ ते १८ पैशांची तर डिझेलच्या ८ ते १३ पैशांची वाढ झाली आहे.ब्रेंट कू्रड तेल आणि अमेरिकेचे वेस्ट टेक्सास इंटरमीडियट (डब्ल्यूटीआय) तेल यांचे दर प्रत्येकी २४ सेंटनी उतरले आहे. ब्रेंट क्रूड ७१.५९ डॉलर प्रतिबॅरल, तर डब्ल्यूटीआय ६५.७ डॉलर प्रतिबॅरल झाले. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे कच्चे तेल दबावात राहील, असे सूत्रांनी सांगितले. इराण हा पेट्रोलियम निर्यातदार राष्ट्र संघटनेतील (ओपेक) तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.कर कपात गरजेचीमे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढून नव्या उच्चांकावर गेले होते. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी करात कपात करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. तथापि, सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही.२९ मेनंतर सलग २० दिवस किमती घसरल्या. तेल उत्पादन दररोज १ दशलक्ष बॅरलने वाढविण्याचा निर्णय ओपेक देशांनी घेतल्यामुळे ही दर कपात झाली होती.

टॅग्स :पेट्रोलडिझेल