Join us  

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलचा भडका, चार वर्षात उच्चांक गाठला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 4:27 PM

2014 नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा मोठा उच्चांक आहे.

नवी दिल्ली - एक एप्रिलपासून भारतात आर्थिक नव्या आर्थिक वर्षाला सुरवात होते. येत्या वर्षात सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहीलेले महत्वाचे केंद्रस्थान म्हणजे, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार? याकडे असतानाच सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज रविवारी देशभरात उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 73 रुपये 73  पैशांवर पोहोचले. तर डिझेलचे दर 64 रुपये 58 पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईतही पेट्रोलच्या दराने 81 रुपयांचा तर डिझेलच्या दराने 68 रुपयांचा पल्ला ओलांडला आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे 72 रुपये 66 पैसे तर डिझेलचे दर 61 रुपये 27 पैसे इतके होते.  

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात.  14 सप्टेंबर 2014 नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा मोठा उच्चांक आहे. चार वर्षापूर्वी पेट्रोलच्या दराने 76 रुपये 06 पैशांचा पल्ला गाठला होता. तर फेब्रुवारी 2018 नंतर डिझेलच्या दराने गाठलेला हा नवा पल्ला आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत डिझेलचे दर लिटरमागे 64 रुपये 22 पैसे इतके होते. आता हे दर हेच दर 64 रुपये 58 पैशांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल