Join us  

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 11:22 AM

Petrol Diesel Price: सलग 29 दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लंडनमध्ये ब्रेंट क्रूडचा दर 53.89 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर अमेरिकी WTI क्रूडचा दर प्रति बॅरल 50 डॉलर पेक्षाही जास्त आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून द्या आजचे दर...

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे. सलग 29 दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर 23 पैशांनी वाढून 84.20 रुपये प्रति लीटर झाले आहेत, तर डिझेलचे दर 26 पैसे प्रति लीटरने वाढून 74.38 रुपये झाले आहेत. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर रिव्हाइज करतात. 

दरम्यान, 8 डिसेंबरपासून इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र, वर्षाच्या पहिल्या महिन्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज आवश्यक असणार्‍या बर्‍याच गोष्टींवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर लक्ष ठेवून असतो. 

अशाप्रकारे जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे नवीन दर....देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

'या' शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या...>> दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि  डिझेल74.38 रुपये लीटर>>  मुंबई- पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर>> कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर>> चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेल 79.72 रुपये लीटर>> बंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर>> नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर>>  गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर>> लखनऊ- पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर>> पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लंडनमध्ये ब्रेंट क्रूडचा दर 53.89 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर अमेरिकी WTI क्रूडचा दर प्रति बॅरल 50 डॉलर पेक्षाही जास्त आहे. देशांतर्गत बाजारात गेल्यावर्षी दुसऱ्या सहामाहीत पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजी कायम होती. यानंतर अनेकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी-जास्त होत होत्या. मात्र, 8 डिसेंबरपासून दर स्थिर होते.

टॅग्स :पेट्रोलव्यवसायडिझेल