Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल होणार ४ रुपयांनी स्वस्त?

By admin | Updated: December 14, 2015 12:41 IST

तरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ११ वर्षांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याने येत्या काही दिवसात पेट्रोलची किंमत प्रतिलीटर चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, १४ - आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ११ वर्षांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याने येत्या काही दिवसात पेट्रोलची किंमत प्रतिलीटर चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. 
तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधन दरांचा आढावा घेतात.  मागील पंधरवड्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत समीक्षा करणार असून उद्याच न्वया दरांबाब घोषणा होण्याची शक्यता आहे. पेट्रोलचे दर आता प्रती लिटर १  पाऊंडच्या खाली पोहोचला असून ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ३९ डॉलरवर पोचले आहे. 
सरकारने अबकारी करात वाढ न केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर लसवकरच कमी होऊ शकतात. गेल्या 18 महिन्यांच्या काळात अबकारी करात तब्बल पाच वेळा वाढ करण्यात आली असून २६ नोव्हेंबरच्या पंधरवड्यात कच्च्या तेलाचे दर ४१.१७ डॉलर प्रति बॅरल इतके होते. मात्र आता तोच दर ३७ डॉलरवर पोचले असून ११ वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २००४ साली कच्च्या तेलाचे दर याच पातळीवर होते.