Join us

पेट्रोल, डिझेलच्या दरात जुजबी कपात

By admin | Updated: February 2, 2016 03:03 IST

सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ४ आणि ३ पैसे प्रति लिटर अशी जुजबी कपात करताना अबकारी शुल्कात वाढ करीत ग्राहकांना त्याचा लाभ दिलेला नाही.

नवी दिल्ली : सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ४ आणि ३ पैसे प्रति लिटर अशी जुजबी कपात करताना अबकारी शुल्कात वाढ करीत ग्राहकांना त्याचा लाभ दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती घसरल्यामुळे तेल कंपन्यांनी दरकपात जाहीर केली.गेल्या पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे दर ४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरल एवढे कमी झाल्यामुळे पेट्रोलचे आणि डिझेलचे दर अनुक्रमे १.०४ आणि १.५३ रुपये प्रति लिटर एवढे कमी व्हायला हवे होते. किंमतीचा आढावा घेण्याच्या पूर्वसंध्येला सरकारने पेट्रोलवरील अबकारी शुल्क १ रुपयाने तर डिझेलवरील शुल्क प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढविले. या महिन्यात तिसऱ्यांदा अबकारी शुल्कात वाढ केल्यामुळे सरकारच्या तिजोरीत उर्वरित आर्थिक वर्षात अतिरिक्त ३२०० कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)> पाचवेळा शुल्क आकारले गेले नसते तर पेट्रोलचे दर ५५.९३ आणि डिझेलचे दर अवघे ३७.७१ रुपये प्रति लिटर एवढे राहिले असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या दरात मोठी घसरण सुरू असल्यामुळे दोन महिन्यांत पाचवेळा दरकपात जाहीर करण्यात आली आहे.