Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचे भाव सलग पाचव्या दिवशी घसरले, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:51 IST

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग पाचव्या दिवशी घसरले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरून प्रतिबॅरल ६४ डॉलरच्या खाली स्थिरावल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना छोटासा का होईना, दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग पाचव्या दिवशी घसरले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्याकिमती घसरून प्रतिबॅरल ६४ डॉलरच्या खाली स्थिरावल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांना छोटासा का होईना, दिलासा मिळाला आहे.सोमवारी ब्रेंट क्रूडच्या दरात ६३ सेंटची वाढ झाली असली, तरी ब्रेंटचे प्रतिबॅरल दर ६३.४२ डॉलरराहिले. त्यामुळे सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात २१ पैशांचीघसरण झाली. इंडियनआॅईलच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दरकपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल७३.०१ रुपये लिटर झाले. कोलकत्यात ते ७५.७० रुपये, तर चेन्नईत ७५.७३ रुपये लिटर झाले. डिझेलचे दर दिल्लीत ६३.६२ रुपये, कोलकत्यात ६६.२९ रुपये, मुंबईत ६७.७५ रुपये आणि चेन्नईत ६७.०९ रुपये लिटर झाले.गेल्या पाच दिवसांत पेट्रोलचे दर लिटरमागे ३७ पैशांनी, तर डिझेलचे दर ६० पैशांनी कमी झाले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती दोन महिन्यांच्या नीचांकावर (६३.४२ डॉलर प्रतिबॅरल) गेल्या आहेत. अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडच्या किमतीही ६० डॉलरच्या खालीयेऊन प्रतिबॅरल ५९.८३ डॉलर झाल्या आहेत. अमेरिकेने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविल्यामुळे जागतिक बाजारात दर घसरत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी म्हटले होते की, कच्च्या तेलाच्या किमतींबाबत कोणताही अंदाज बांधणे कठीण आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सांगितले की, कच्च्या तेलाचे दर खाली किंवा वर अशा दोन्ही दिशांना हलू शकतात. त्यामुळे दोन्ही शक्यतांसाठी रिझर्व्ह बँकेने तयार राहायला हवे. जागतिक आकडेवारीनुसार, अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या दरांतसतत वाढ-घट होत असल्याचे दिसून आले आहे.- रशियाच्या नेतृत्वाखालील पेट्रोलियम पदार्थ उत्पादक व निर्यातदार देशांनी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही दरवाढ झाली होती. दरम्यान, इराणने तेल उत्पादन वाढविण्याची मोठी योजना जाहीर केल्यामुळे ओपेक देशांच्या निर्णयाला धक्का बसला. अमेरिकेतील तेल उत्पादन आधीच वाढलेही आहे.

टॅग्स :पेट्रोल