Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?

By admin | Updated: December 15, 2015 04:55 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने दशकभरातील नीचांक गाठत प्रति बॅरल ३७ अमेरिकी डॉलरची पातळी गाठल्याने पेट्रोलच्या किमती प्रति लीटर किमान साडे तीन रुपये

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने दशकभरातील नीचांक गाठत प्रति बॅरल ३७ अमेरिकी डॉलरची पातळी गाठल्याने पेट्रोलच्या किमती प्रति लीटर किमान साडे तीन रुपये तर डिझेलच्या किमती किमान पावणे तीन रुपयांनी स्वस्त होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तेल कंपन्यांच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. जून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होताना दिसत असून गेल्या १५ दिवसांत तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीमधील विक्रमी घसरणीमुळे दोन्ही प्रमुख इंधनाच्या किमतीमध्ये मोठी कपात अपेक्षित आहे. (प्रतिनिधी) तेलाच्या घसरणाऱ्या किमतीच्या अनुषंगाने सरकारी तिजोरी भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या सव्वा वर्षात तीन वेळा केंद्रीय उत्पादन शुल्कात वाढ केली. यामुळे सरकारला वर्षभराच्या कालावधीमध्ये सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार असून यापैकी १५ हजार कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले. तेल आणखी स्वस्त सिंगापूर : आशियाच्या बाजारात सोमवारी तेलाचे भाव खाली आले. अमेरिकेची वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे तेल बॅरलमागे १६ सेंटस्ने घसरून ३५.४६ अमेरिकन डॉलरवर, तर ब्रेंटचे क्रूड तेल २६ सेंटस्ने स्वस्त होऊन ३७.६७ अमेरिकन डॉलर झाले.