नवी दिल्ली : सरकारने पेन्शनधारकांची खाती आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे सर्व बँकांना आदेश दिले आहेत. केंद्रीय सरकारच्या पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने बँकांनी अशा ग्राहकांचे मोबाईल क्रमांकही नोंदवून घ्यावेत, असेही सूचित करण्यात आले आहे. यामागे पेन्शनचे वितरण सुलभ करण्याचा उद्देश आहे.दरम्यान, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयला केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना आधार क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. देशात कुठेही, बारा अंकी आधार क्रमांक ओळख व पत्ता यासाठीचा पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. ‘आधारसंलग्न डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ उपक्रमांतर्गत सरकारने हे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० नोव्हेंबर रोजी डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजनेचा शुभारंभ केला होता. बँकांनी वेळोवेळी माहिती अद्ययावत करून घ्यावी. वर्षातून एकदा पेन्शनधारकाच्या माहितीचा आढावा घ्यावा.
पेन्शनची खाती ‘आधार’शी जोडणार
By admin | Updated: December 5, 2014 02:15 IST
१० नोव्हेंबर रोजी डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजनेचा शुभारंभ केला होता. बँकांनी वेळोवेळी माहिती अद्ययावत करून घ्यावी. वर्षातून एकदा पेन्शनधारकाच्या माहितीचा आढावा घ्यावा.
पेन्शनची खाती ‘आधार’शी जोडणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}