Join us  

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी आणखी वाढणार! परदेशी अहवालात खुलासा; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:45 PM

गेल्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात कारवाई केली होती. आता आरबीआयने १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात कारवाई केली होती. दरम्यान, कंपनीला दिलासा देत आरबीआयने १५ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. पण आता विदेशी कंपनीचे पेटीएम पेमेंट्सबाबत वेगळे मत आहे, यामुळे पेटीएमच्या अडचणी वाढू शकतात. RBI आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने पेटीएम आपल्या बहुतांश ग्राहकांची बचत करण्यात यशस्वी होईल. पण, पेटीएमचे व्यापारी आणि ग्राहक सुमारे २० टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असा दावा स्वित्झर्लंडच्या गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा समूह UBS च्या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे आता पेटीएम पेमेंट्स बँकेच्या आणखी वाढू शकतात.

यामुळे आता कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये संघर्ष करावा लागू शकतो. UBS ने अहवालात म्हटले आहे की, वॉलेट व्यवसाय संपुष्टात आल्याने कंपनीच्या महसुलावर विपरित परिणाम होणार असून पेमेंट आणि कर्ज व्यवसाय स्थिर करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल.

आणखी एका भारतीयाच्या हाती अमेरिकेतील बहुचर्चित टेक कंपनीची धुरा, गुगलमध्येही केलंय काम

UBS च्या अहवालानुसार, Paytm ची सर्वात मोठी समस्या ग्राहकांचा विश्वास जिंकणे असेल. त्यासाठी त्याला मार्केटिंगवरचा खर्च वाढवावा लागेल. यामुळे कंपनीचा EBITDA तोटा वाढेल. कंपनीचे शेअर्सही 510 ते 650 रुपयांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. कंपनीची कामगिरी सुधारण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीला खूप मेहनत करावी लागू शकते.

याशिवाय RBI ने @paytm UPI हँडलबाबत शंका दूर केल्या आहेत. पेटीएम व्यापारी इतर बँकांमध्ये हस्तांतरित केले जातील. तसेच, NPCI कडून मंजुरी मिळाल्यानंतर, Paytm देखील थर्ड पार्टी ॲप प्रदाता म्हणून काम करू शकेल. PhonePe आणि Google Pay देखील TPAP प्रमाणे काम करतात. आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट्सच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. 

टॅग्स :पे-टीएमव्यवसाय