Join us  

पेटीएम गुंतवणूकदारांचे बुडाले ३८ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 6:40 AM

भारतातील सर्वांत मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमच्या समभागांचे गुरुवारी लिस्टिंग झाले तेच मुळी कमी किंमतीला . त्यानंतर कंपनीचे समभाग लगेच घसरणीला लागले

ठळक मुद्देभारतातील सर्वांत मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमच्या समभागांचे गुरुवारी लिस्टिंग झाले तेच मुळी कमी किंमतीला . त्यानंतर कंपनीचे समभाग लगेच घसरणीला लागले

नवी दिल्ली : गुरुवारी पेटीएमचे शेअर बाजारातील लिस्टिंग कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ३८ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. लिस्टिंगनंतर कंपनीचे समभाग २७ टक्क्यांपेक्षा  अधिक प्रमाणात घसरल्याचे दिसून आले. 

भारतातील सर्वांत मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमच्या समभागांचे गुरुवारी लिस्टिंग झाले तेच मुळी कमी किंमतीला . त्यानंतर कंपनीचे समभाग लगेच घसरणीला लागले. दिवसभरात ते २७ टक्क्यांपेक्षाही अधिक प्रमाणात घसरले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर प्रतिकूल परिणाम झाला. पेटीएमने  समभागाचे मूल्य २,१५० रुपये ठेवले होते. कंपनीचा समभाग लिस्ट झाल्यानंतर मुंबई शेअर बाजारात ५८५.८५ रुपयांनी अथवा २७.२५ टक्क्यांनी घसरला.

n सकाळच्या सत्रात पेटीएमचा समभाग १,९५० रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर तो आणखी घसरत गेला. लिस्टिंगवेळी कंपनीचे बाजारातील भांडवली मूल्य १.३९ लाख कोटी रुपये होते. ते सत्राच्या अखेरीस घसरून १.०१ लाख कोटी रुपये झाले. बीएसईमध्ये कंपनीच्या १०.०६ लाख समभागांची खरेदी-विक्री झाली.  एनएसईमध्ये कंपनीच्या २.३ कोटी समभागांचे व्यवहार झाले.

टॅग्स :पे-टीएम