अनियमित बससेवेमुळे प्रवाशांचे हाल अकोला-मांजरी एसटीचा पोरखेळ
By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST
मांजरी : अकोला ते मांजरी एसटी बसच्या अनियमितपणामुळे शेकडो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला आगार क्रमाक एक येथून सकाळी ८.३० वाजता अकोला-मांजरी ही बस सुरू आहे; परंतु महिन्यातून १५ दिवस ही बस पाठविल्या जात नाही. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होत आहे. अनेकदा एसटी चालक व वाहक तयार असतात; मात्र गाडी उपलब्ध नाही असे कारण सांगितल्या जाते. या एसटीमधून मांजरी, बादलापूर,अमानतपूर येथील विद्यार्थी अकोला येथे शिक्षणासाठी येतात; परंतु एसटीचा काहीच भरवसा नसल्याने विद्यार्थ्यांकडे पासेस असूनसुद्धा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. आगर व्यवस्थापकाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दिवसांपासून गावकरी हा त्रास सहन करीत आहेत. सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा या गावासाठी बसेस सोडण्यात येतात. दररोज नियमित गाड्या येत नाहीत. एसट
अनियमित बससेवेमुळे प्रवाशांचे हाल अकोला-मांजरी एसटीचा पोरखेळ
मांजरी : अकोला ते मांजरी एसटी बसच्या अनियमितपणामुळे शेकडो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला आगार क्रमाक एक येथून सकाळी ८.३० वाजता अकोला-मांजरी ही बस सुरू आहे; परंतु महिन्यातून १५ दिवस ही बस पाठविल्या जात नाही. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होत आहे. अनेकदा एसटी चालक व वाहक तयार असतात; मात्र गाडी उपलब्ध नाही असे कारण सांगितल्या जाते. या एसटीमधून मांजरी, बादलापूर,अमानतपूर येथील विद्यार्थी अकोला येथे शिक्षणासाठी येतात; परंतु एसटीचा काहीच भरवसा नसल्याने विद्यार्थ्यांकडे पासेस असूनसुद्धा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. आगर व्यवस्थापकाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दिवसांपासून गावकरी हा त्रास सहन करीत आहेत. सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा या गावासाठी बसेस सोडण्यात येतात. दररोज नियमित गाड्या येत नाहीत. एसटीच्या मनमानी कारभारामुळे या भागात अवैध प्रवासी वाहतुकीने डोके वर काढले आहे. (वार्ताहर)