Join us

प. बंगालमधील बटाटे उत्पादन ११0 लाख टनांवर

By admin | Updated: January 14, 2015 00:05 IST

२0१५ मध्ये प. बंगालमधील बटाट्याचे उत्पादन १0 टक्क्यांनी वाढून ११0 लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे.

कोलकता : २0१५ मध्ये प. बंगालमधील बटाट्याचे उत्पादन १0 टक्क्यांनी वाढून ११0 लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल शीतगृह असोसिएशनचे अध्यक्ष रामपद पॉल यांनी सांगितले की, बटाट्याच्या पिकाखालील क्षेत्र १0 टक्क्यांनी वाढून ४.५ लाख हेक्टर झाले आहे. त्यानुसार, आम्ही उत्पादनातही १0 टक्के वाढ गृहीत धरली आहे. यंदाही पीक उत्तम असल्यामुळे ही वाढ अपेक्षितच आहे. ११0 लाख टन बटाटे यंदा उत्पादित होऊ शकतात.शीतगृह असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष पतिपाबन डे यांनी सांगितले की, नवीन माल बाजारात येऊ लागला आहे. राज्यातील ४३५ शीतगृहांत ६२ लाख टन बटाटे साठवून ठेवण्यात आले आहेत. बटाट्यांसाठी आवश्यक असलेल्या शीतगृहांची संख्या यंदा ३ टक्क्यांनी वाढली आहे. वाढीव उत्पादनासाठी ती उपयोगी पडू शकेल. शेतकऱ्यांच्या शेतातील बटाटा निघायला लागला, की भाव कोसळतात. या विरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या मुद्यावर डे यांनी सांगितले की, बटाट्यांचे दर यंदा १0 ते १२ रुपये किलोच्या खाली येणार नाहीत, असे दिसते.