Join us
Daily Top 2Weekly Top 5

पान १ : सिंगल

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

मालवणला समुद्रात

मालवणला समुद्रात
दोन संशयास्पद बोटी
मालवण : मालवण किनारप˜ीवर दोन संशयास्पद बोटी सुरक्षा यंत्रणेला दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. यातील एक बोट रविवारी रात्री उशिरा दिसेनासी झाली तर एक बोट मालवण कवडा रॉक परिसरात दहा वाव खोल समुद्रात दिसल्याचे स्थानिक मच्छीमार व कोस्ट गार्ड यांनी पोलीस यंत्रणेला सांगितले. याबाबत नेव्ही, कोस्ट रत्नागिरी येथील यंत्रणेला माहिती दिली आहे. याबाबत माहिती अशी की, रविवारी दुपारी वेंगुर्ले-निवती लालबत्ती येथील कर्मचार्‍यांना दहा ते बारा वाव खोल समुद्रात दोन बोटी रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. त्यांनी ही माहिती बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांना दिली. ताम्हणकर यांनी मालवण पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. किनार्‍यावर रात्री पावसाचा जोर असल्याने या बोटीचा शोध सोमवारी सकाळी घेण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.(वार्ताहर)