नवी दिल्ली : पाकिस्तानात सिंध प्रांतात गत आठवड्यात झालेल्या मोठ्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानने अतिरेक्यांविरुद्ध मोहिमच सुरु केली आहे. बुधवारी रात्री खैबर एजन्सी भागात अतिरेकी अड्डे लक्ष्य करण्यात आले. लष्कर ए इस्लाम आणि दईशचे (इसिस) तीन अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यात पाच अतिरेकी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. जिओ टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. सिंध प्रांतात गत गुुरुवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ८८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या कारवाईला पाकिस्तानच्या सशस्त्र दलाने दुजोरा दिला आहे. हवाई दलाने तीन अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. खैबर एजन्सीच्या राजगल भागात अफगाणिस्तानच्या सिमेवर ही कारवाई करण्यात आली.
अतिरेकी अड्ड्यांवर पाकिस्तानचा हल्ला
By admin | Updated: February 23, 2017 01:27 IST