Join us
Daily Top 2Weekly Top 5

पान 8- बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसाशाखेतर्फे ई-गॅलरी

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

पणजी : बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेतर्फे ई-गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक बॅँकिंग सेवेची सोय ई-गॅलरीमुळे झालेली आहे. बॅँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुधीर जादे यांच्या हस्ते बॅँकेच्या 109 व्या स्थापनादिनानिमित्त ही सुविधा सुरू करण्यात आली. या वेळी ग्राहक आणि निमंत्रितांची मोठी गर्दी झाली होती.

बॅँकेतर्फे मुख्य व्यवस्थापक मोतीलाल सिंग यांनी स्वागत केले. बॅँक ऑफ इंडियाच्या गोव्याचे उपविभागीय व्यवस्थापक बी.के. आर्सेकर यांनी मार्गदर्शन केले. विशेष निमंत्रित ग्राहक किशोर बर्वे या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. बॅँकेशी असणार्‍या प्रदीर्घ स्नेहभावाला त्यांनी या वेळी उजाळा दिला. या वेळी वरिष्ठ व्यवस्थापक जॉर्ज डिलीमा उपस्थित होते. म्हापसा बॅँक शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक उमेश धारगळकर यांनी आभार मानले.
फोटो : बॅँक ऑफ इंडियाच्या म्हापसा शाखेतर्फे ई-गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक सुधीर एस. जादे, विशेष निमंत्रित ग्राहक किशोर बर्वे, उपविभागीय व्यवस्थापक बी.के. आर्सेकर, मुख्य व्यवस्थापक मोतीलाल सिंग आदी.