Join us

पान 7 : हेल्मेट सक्ती आणि पायलट

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

युवकांनी हेल्मेट वापरावेच : फुर्तादो

युवकांनी हेल्मेट वापरावेच : फुर्तादो
मडगाव : दुचाकी चालवताना महाविद्यालयीन युवकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे व हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन कामगारमंत्री आवेर्तीन फुर्तादो यांनी नावेली येथे रोझरी महाविद्यालयात चौथ्या राज्य सुरक्षा सप्ताहावेळी केले.
या वेळी व्यासपीठावर वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई, रोझरी महाविद्यालयाचे प्राचार्य फा. डॉ. सिमांव दिनीज, साहाय्यक वाहतूक संचालक संदीप देसाई, वाहतूक उपसंचालक लक्ष्मीकांत कुंडईकर उपस्थित होते.
फुर्तादो म्हणाले, काही महाविद्यालयीन युवक भरधाव वेगाने वाहने हाकत असल्याचे अनेक वेळा आपल्याही निदर्शनास येते. त्यांच्या पालकांना आपण माहिती देतो; परंतु त्या वेळी पालक आम्ही आमच्या मुलांची काळजी घेऊ, असे सांगतात व अपघात घडल्यानंतर पहिला फोन कॉल आपल्याला येतो त्यानंतर संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना रुग्णांची काळजी घेण्यासाठी सांगितले जाते.
वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दुचाकी वाहनचालकांनी आयएसआय मार्क असलेल्या हेल्मेटचा वापर करावा, असे सांगितले. काही दुचाकीचालक हेल्मेट डोक्यावर न घालता दुचाकीच्या आरशाला, पेट्रोलच्या टाकीवर ठेवतात, ते अयोग्य आहे.
या वेळी साहाय्यक वाहतूक संचालक संदीप देसाई यांनी गोव्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात कसे घडले यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अपघात कसे टाळावेत, या संदर्भात मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

ढँ3 : 0909-टअफ-17
कॅप्शन: रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात बोलताना मजूरमंत्री आवेर्तीन फुर्तादो. सोबत वाहतूक संचालक अरुण देसाई, प्रा. डॉ. सिमांव दिनीज, नावेलीचे सरपंच फ्रँक फर्नांडिस व साहाय्यक वाहतूक संचालक संदीप देसाई.
----------

हणजूण भागात पायलटांचा
सहप्रवाशास हेल्मेट सक्तीला विरोध
हणजूण : दुचाकीवर सहप्रवाशाला वाहतूक खात्याने केलेल्या हेल्मेट सक्तीला हणजूण, कायसूव, वागातोर येथील मोटरसायकल पायलटांनी विरोध केला आहे. तशा प्रकारचे निवेदन वाहतूक संचालक, वाहतूकमंत्री व स्थानिक आमदारांना देण्याचे या मोटरसायकल पायलटांच्या बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीला नवनाथ पोपकर, रमेश शिरोडकर, मंगलदास कोटकर, सावळो केरकर, मुरारी हरमलकर, रामा आराबेकर, दिलीप गोवेकर, सुरेश दाभोळकर, रमेश खांडेपारकर, गंगाधर खांडेपारकर, दामू पेडणेकर, ज्ञानेश्वर बेतकर, कुष्टा शिरोडकर, नेल्सन डिसोझा, शाम कवठणकर, अँलेक्स डिसोझा, लुकास डिसोझा, रवी पार्सेकर, बेर्नाद फर्नांडिस, प्रकाश मडगावकर, अशोक परोब आदी मोटरसायकल पायलट उपस्थित होते.
एका प्रवाशाने वापरलेले हेल्मेट दुसरा वापरणार याची खात्री देता येत नाही. काही जणांच्या डोक्यात कोंडा अथवा डोक्यावर जखम असल्याची शक्यता असते. कोणाला स्पॉन्डीलीसीसचा त्रास असू शकतो. हेल्मेट वापरणे सक्तीचे झाल्यास व्यवसायावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यातच दोन-तीन हेल्मेट सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी पायलटांची बैठक बोलावून वाहतूक संचालक, स्थानिक आमदारांना निवेदन देण्यास सांगितल्याचे या पायलटांनी सांगितले. (वार्ताहर)
------------

हरमल भागातही पायलट संतप्त
हरमल : गोव्यातील वाहतूक खात्याने केंद्रीय वाहतूक नियमाअंतर्गत हेल्मेट सक्ती ठरविली ही चांगली गोष्ट आहे; परंतु सहप्रवाशास हेल्मेट सक्ती करून खाते नेमके काय दर्शवते, असे म्हणताना पायलट व्यावसायिकांना नुकसानीत ढकलणारी सक्ती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, त्यामुळे वाहनचालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काँग्रेस सत्ताकाळात उच्च सुरक्षा नंबर प्लेट प्रकरण बरेच गाजले होते. त्याच धर्तीवरील ही सक्ती वाहनचालकांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. गोव्यातील रस्त्यांची स्थिती सांगण्याजोगी नाही; परंतु हेल्मेट सक्ती करताना महामार्ग व हमरस्ता यात फरक राखणे महत्त्वाचे आहे. गावातील अंतर्गत रस्त्यातील वाहतुकीस हेल्मेट सक्तीची गरज वाटत नाही; परंतु पूर्वीच्याच महामार्गावरील रस्त्यावर हेल्मेट परिधान करणे सक्तीचेच ठेवण्याची गरज असताना वाहतूक खाते अस्ताव्यस्तपणे सर्वच मार्गावर व सहप्रवाशांनासुद्धा हेल्मेट सक्ती करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)


चौकट
हात ओले ..
सध्या पर्यटन हंगाम तोंडावर असल्याने विदेशी पर्यटक म्हणजे नको ती झंझट म्हणत हात ओले करणार यात तिळमात्र शंका नाही. म्हणूनच कायद्याची अंमलबजावणी पोलिसांसाठी लाभदायक आहे हे नक्की, असा सूर पायलट व्यक्त करीत आहेत.

काणकोणातही विरोध
खोतीगाव : चालकांबरोबर दुचाकीच्या मागे बसणार्‍या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे सक्ती असलेल्या कायद्याला काणकोण पायलटांनी विरोध दर्शविला आहे; कारण दोन हेल्मेट मोटरसायकलवर सांभाळणे, हे शक्य नसून सरकारने पायलटांची परिस्थिती लक्षात घ्यावी. असाच कायदा यापूर्वीही काढला होता आणि त्या वेळी दुचाकीस्वार व पायलटांच्या समस्या ऐकून सरकारने तो कायदा रद्द केला होता. तरी सरकार आता पुन्हा तोच कायदा सुरू करून हेल्मेट कंपनीकडे गिर्‍हाईक तयार होण्याचे सरकारने सेटिंग चालविले आहे का, असा सवालही विचारत यावर काणकोण पायलटांनी विरोध केला. या वेळी पायलट दिनेश देसाई, शांता महाले, व्यंकट पागी, संजय कोमरपंत, संदीप देसाई व येदू डिकॉस्ता यांनी याला विरोध केला.
(वार्ताहर)

चौकट
मंत्र्यांनीच स्वत: मॉडेल बनावे
मंत्र्यांनी स्वत: दिव्याची गाडी सोडून दुचाकीवरून एक महिना तरी हेल्मेट घालून आणि मागे बसलेल्यांनाही हेल्मेट घालून फिरावे आणि याचा किती त्रास होतो की, फायदा याची जाणीव करून घ्यावी. कायदे करताना ज्यांच्यासाठी करतात त्यांचाही विचार करावा, असेही काणकोणातील पायलटांनी सांगितले.


ढँ3 : 1209-टअफ-04
कॅप्शन: हेल्मेट सक्तीसंदर्भात नाराजी व्यक्त करताना काणकोणातील पायलट. (छाया: देवीदास गावकर)

पायलटांना वगळा
डचोली : अनेक वर्षे आम्ही ‘पायलट’चा व्यवसाय अत्यंत जबाबदारी आणि विश्वासाने करीत आहोत. हेल्मेटची सक्ती पायलटच्या मागे बसणार्‍यालाही केली तर आम्हाला हा व्यवसाय सोडून देण्याशिवाय पर्याय नसेल, असे मत डिचोलीतील पायलटांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
या वेळी अशोक लाड, रामचंद्र गावडे, शेख अल्लाउद्दीन, कमलाकांत नाईक, कृष्णा कवळेकर, भारत पाडेलकर, रमाकांत कळणेकर, गुरुदास नाईक, रवींद्र रायकर आदींनी माहिती दिली.
पायलटांच्या व्यवसायात मागे बसणार्‍याने घातलेले हेल्मेट दुसरी व्यक्त घालणार नाही. तसेच महिला ज्या फुले वैगरे माळून असतात, त्या हेल्मेट घालण्यास नकार देतात. परिणामी, आमच्या व्यवसायावरच संकट येईल, असेही पायलटांनी सांगितले. सरकारने मोठा गाजावाजा करून केलेली पायलटांसाठीची योजना बंद पडली असून, ती आर्थिक मदतीची योजना त्वरित पुन्हा सुरू करण्याची मागणी पायलटांनी केली. (लो. प्र.)

फोटो : डिचोली बसस्थानकावरील पायलट. (दुर्गादास गर्दे) डीएससीएफ 4410 मेल