Join us

पान ४ - करुणा गोवेकर नगराध्यक्षपदी अविरोध निवड

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST

डिचोली : डिचाली नगराध्यक्षपदी करुणा गोवेकर यांची बिनविरोध निवड झालेली असून आज त्यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची निवड आज औपचारिकता होण्याचे बाकी आहे़

डिचोली : डिचाली नगराध्यक्षपदी करुणा गोवेकर यांची बिनविरोध निवड झालेली असून आज त्यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची निवड आज औपचारिकता होण्याचे बाकी आहे़
डिचोली पालिका सभागृहात आज निर्वाचन अधिकारी विजू नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक होणार आहे़ काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्धारित वेळेत करुणा गोवेकर यांचाच अर्ज दाखल झाला़ त्यांना नारायण बेतकीकर व बाळू बिर्जे यांनी अनुमोदन दिले आहे़
हल्लीच अनिशा वेर्णेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सहा विरुद्ध ० मतांनी संमत झाला होता़ आता पालिकेची पूर्ण सूत्रे भाजपाकडे आलेली असून सर्वांच्या सहकार्याने संघटित विकास करण्यासाठी प्रचार करणार असल्याचे उपनगराध्यक्ष रियाज बेग यांनी सांगितले़