Join us
Daily Top 2Weekly Top 5

पान 3 : जोड बातमी..पावसाअभावी भातपिकावर संकट

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

शेतकर्‍यांसाठी सूचना

शेतकर्‍यांसाठी सूचना
ज्या शेतकर्‍यांचे भातपीक, मिरचीचे पीक तसेच तत्सम कोणतेही पीक अजून पिकून पूर्ण झाले नसल्यास त्यास आवश्यक पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी. डोंगराळ भाग वगळता सखल भागात बर्‍याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. अशा शेतकर्‍यांनी पावसावर विसंबून न राहता पिकाला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करावी, असे आवाहन खात्याने केले आहे.
उत्पादन घटण्याची शक्यता
यंदा सुरुवातीपासून कमी पाऊस पडल्यामुळे शेतीची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. सखल भागातील शेतीचे पीक पूर्ण झाले. मात्र, डोंगराळ भाग आणि पाण्यापासून दूर असलेल्या भागात पावसाच्या पाण्याअभावी भातपिके करपून गेली. राज्यातील 30 टक्के शेतकर्‍यांनी सुरुवातीलाच भातशेती लावण्याची उत्सुकता दाखवली नाही. र्शीपद्धतीने लावण्यात येणार्‍या शेतीचे प्रमाणही खूप कमी आहे. पूरक पाण्याअभावी चांगल्या प्रमाणात पीकही आले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेले भात उत्पादनाचे प्रमाण यंदा घटण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.