पान 1 : आत्महत्या
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST
साहाय्यक अभियंत्याची कार्यालयात आत्महत्या
पान 1 : आत्महत्या
साहाय्यक अभियंत्याची कार्यालयात आत्महत्यामडगाव : घोगळ येथे जलसंसाधन विभागाच्या कार्यालयातच साहाय्यक अभियंत्याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजले नाही, असे पोलिसांनी सांगितले. किरण गोडबोले (वय 55) असे मृताचे नाव आहे. ते मूळचे कर्नाटकातील धारवाडचे. आर्ले येथे ते कुटुंबासह राहतात. शनिवारी सायंकाळी ते घरी न परल्यामुळे घरच्या लोकांनी शोध घेतला. त्यांनी कार्यालयातील अन्य कर्मचार्यांशी संपर्क साधला. कर्मचारी कार्यालयात आले असता हा प्रकार उघडकीस आला. कार्यालयात स्वयंपाकघरही आहे, तेथे छताला किरण यांनी गळफास घेतला होता. ते अत्यंत मनमिळावू होते, असे घटनास्थळी समजले. त्यांना काही व्याधीही होत्या, अशीही माहिती मिळाली.