पान 1- राजनाथ सिंह कोंडीत मुलाविषयीच्या वृत्ताने बेजार : पीएमओचा खुलासा
By admin | Updated: August 27, 2014 23:46 IST
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या ‘कथित लाचखोरी’च्या बातम्यांमुळे भाजपातील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले असून यासंदर्भात खुद्द राजनाथ आणि पंतप्रधान कार्यालयाला(पीएमओ) खुलासा करावा लागला आह़े माझ्या व माझ्या मुलासंदर्भात पसरवल्या जात असलेल्या बातम्यांमध्ये जराही तथ्य आढळल्यास मी राजकारण सोडून घरी बसेन, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे, तर पीएमओनेही या निव्वळ अफवा असल्याचा निर्वाळा दिला आह़े
पान 1- राजनाथ सिंह कोंडीत मुलाविषयीच्या वृत्ताने बेजार : पीएमओचा खुलासा
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या ‘कथित लाचखोरी’च्या बातम्यांमुळे भाजपातील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले असून यासंदर्भात खुद्द राजनाथ आणि पंतप्रधान कार्यालयाला(पीएमओ) खुलासा करावा लागला आह़े माझ्या व माझ्या मुलासंदर्भात पसरवल्या जात असलेल्या बातम्यांमध्ये जराही तथ्य आढळल्यास मी राजकारण सोडून घरी बसेन, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे, तर पीएमओनेही या निव्वळ अफवा असल्याचा निर्वाळा दिला आह़ेपंकज याने काम करून देण्यासाठी लाच घेतली आणि हे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला बोलवून त्याची कानउघाडणी केल्याचे वृत्त मीडियाने दिले आह़े राजनाथ यांनी आपल्या मुलाबद्दल अफवा पसरविल्या जात असल्याचा दावा केला असून यासाठी एका सहकारी मंत्र्याला जबाबदार धरले आह़े याबाबत त्यांनी भाजपा आणि संघ परिवाराकडे तक्रार केल्याचेही वृत्त आह़े गेल्या काही दिवसांपासून या बातम्यांनी वातावरण ढवळून निघाले असताना, बुधवारी खुद्द राजनाथ यांनी याप्रकरणी प्रथमच मौन सोडल़े 15-20 दिवसांपासून माझ्या कुटुंबाबद्दल अफवा पसरविल्या जात आह़े या अफवा अल्पावधीतच थांबतील, अशी माझी अपेक्षा होती़ मात्र दिवसागणिक या आणखी जोरकसपणे पेरल्या जात आह़े म्हणून मला खुलासा करावा लागत आह़े माझ्यावरील व माझ्या मुलासंदर्भातील आरोपात जराही सत्यांश आढळला तर मी केवळ राजकारणच नाही तर सार्वजनिक जीवनाचा त्याग करून घरी बसेन, असे मी देशाला आश्वस्त करू इच्छितो असे राजनाथ म्हणाल़ेआपण हे प्रकरण मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याही कानावर टाकल़े त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करून या बातम्या निराधार ठरवल्या, असेही ते म्हणाल़े याप्रकरणी संघ परिवाराकडे तक्रार केल्याचे मात्र त्यांनी नाकारल़े ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़काय आहे प्रकरणएका इंग्रजी दैनिकाने राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज याच्या कथित गैरवर्तनाबाबतचे वृत्त दिले होत़े पंकजने बदली करून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याची चर्चा होती,असे या वृत्तात म्हटले होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क)परिवारात सत्ता संघर्ष /आतील पानात