Join us  

सीमकार्ड विकणाऱ्या 'या' भारतीय तरुणाच्या कंपनीचा चिनी बाजारपेठेत बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 1:02 PM

सध्या चिनी बाजारपेठेत एका 23 वर्षीय भारतीय तरुणाची कंपनी प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली: सध्या चिनी बाजारपेठेत एका 23 वर्षीय भारतीय तरुणाची कंपनी प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या कंपनीचे नाव ओयो रुम्स असून रितेश अग्रवाल हा तरूण या कंपनीचा मालक आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने चिनी बाजारपेठेत अधिकृतरित्या प्रवेश केला. चीनच्या मासायोशी सन या प्रथितयश कंपनीने रितेशच्या ओयो रूम्सशी भागीदारी केली होती. त्यानंतर आता ओयोने चिनी ग्राहकांना सेवा द्यायला सुरुवात केली होती. ओयो रुम्स ही ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान पुरविण्याचे काम करते. चीनची सध्याची सर्वच क्षेत्रातील घौडदौड पाहता एखाद्या भारतीय कंपनीने चिनी बाजारपेठेत अशाप्रकारे बस्तान बसवणे कौतुकाची बाब आहे. सध्या शेनजेन शहरात ओयो रुम्सने ग्राहकांना सेवा पुरवायला सुरुवात केली असून लवकरच चीनमधील 25 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार होईल.ओयो रुम्सच्या या यशानंतर कंपनीचा मालक रितेश अग्रवालही उद्योगविश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही वर्षांपूर्वी रितेश अग्रवाल हा ओदिशातील एका शहरात मोबाईलची सीमकार्ड विकायचा. अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा देण्याच्या तयारीत असलेल्या रितेशने शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ओरावेल स्टे ही कंपनी सुरु केली. या कंपनीने व्हेंचर नर्सरी या गुंतवणूक कंपनीच्या संपर्कात आले. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर व्हेंचर नर्सरीने रितेशला 30 लाख रुपयांचे भांडवल देण्याची तयारी दाखविली. याच भांडवलाच्या सहाय्याने रितेशने 2013 साली ओयो रूम्सची स्थापना केली. त्यानंतर ओयो रुम्सने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार असलेल्या सॉफ्टबँकेच्या मासायोशी सनशी भागीदारी करून ओयो रुम्सने चिनी बाजारपेठेत दमदारपणे प्रवेश केला आहे. 

टॅग्स :चीनव्यवसाय