Join us  

'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 3:00 PM

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कंपनीने ३० टक्के क्षमतेसह काम सुरू केले.

ठळक मुद्देगेल्या ८ जूनला सरकारने दिलेल्या परवानगीनंतर कंपनीने काही हॉटेल्स टप्प्याटप्प्याने सुरू केली आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात 'ओयो इंडिया' या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचाऱ्यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी सुट्ट्या पुढे ढकलण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

ओयोच्या कर्मचार्‍यांना संबोधित करताना अधिकारी रोहित कपूर म्हणाले, "आम्हाला माहीत आहे की आपल्याला थांबवून ठेवणे आव्हानात्मक आहे. मात्र, ही परिस्थिती तुमच्या किंवा आमच्या नियंत्रणात नाही. तुम्ही स्वतः कंपनीपासून दूर जाऊ शकता किंवा आणखी सहा महिने म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मर्यादित लाभासह सुट्ट्या आणखी वाढवू शकता."

याचबरोबर, राहित कपूर म्हणाले, "ओयो कधीच आदर्श स्थितीत असे करत नाही. आम्हाला माहीत आहे की आपण आमच्याकडून बरीच अपेक्षा केली होती परंतु आम्हाला याबद्दल खेद आहे. आपण सध्या अशा जगात राहत आहोत, जिथे सर्व काही आदर्शपासून अगदी दूर आहे."

कोरोना संकटामुळे ओयोने आपल्या भारतीय ऑपरेशनमधील अनेक कर्मचाऱ्यांना मे महिन्यापासून मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविले होते. याशिवाय, सर्व कर्मचार्‍यांना पगारात २५ टक्के कपात स्वीकारण्यास सांगितले होते.

गेल्या ८ जूनला सरकारने दिलेल्या परवानगीनंतर कंपनीने काही हॉटेल्स टप्प्याटप्प्याने सुरू केली आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कंपनीने ३० टक्के क्षमतेसह काम सुरू केले. यामुळे अधिकाधिक रोजगार वाचविण्याच्या प्रतिबद्धतेसाठी कंपनीला प्राधान्यक्रम ठरवावे लागले. यासाठी  कंपनीने कोरोनामुळे प्रभावित झालेल्या काही कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या टीम आणि ठिकाणांवर परत बोलावले आणि त्यांना मर्यादित संधी उपलब्ध करुन दिली आहे.

आणखी बातम्या...

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल     

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसायहॉटेल