Join us

उत्तर प्रदेशात परदेशी पर्यटक यंदा आठ लाखांनी वाढणार

By admin | Updated: March 12, 2015 00:13 IST

उत्तर प्रदेशात २०१७ पर्यंत २८ लाख परदेशी पर्यटक येतील असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. २०१३ मध्ये ही संख्या २०.५ लाख होती.

लखनौ : उत्तर प्रदेशात २०१७ पर्यंत २८ लाख परदेशी पर्यटक येतील असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. २०१३ मध्ये ही संख्या २०.५ लाख होती.असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स आॅफ इंडियाने (असोचेम) नुकतीच उत्तर प्रदेशातील पर्यटनातील संधीचा ‘रियलायझिंग टुरिझम पोटेन्शियल इन यूपी’ या नावाने अभ्यास केला. त्यात परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, असे आढळले. उत्तर प्रदेशात वारसा स्थळांचा विकास, हवाई मार्गांची संख्या वाढविणे, धार्मिक स्थळांची उत्तम व्यवस्था व अन्य आनुषंगिक गोष्टींमुळे राज्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दहा लाख रोजगार निर्माण होतील, असे असोचेमचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले.