ऑनलाइन लोकमत
नवी दिली,दि.१८ - रिगिंग बेल या नोएडा स्थित कंपनीने अवघ्या २५१ रुपयात बाजारात आणलेला ‘फ्रीडम २५१’ स्मार्ट फोन ऑर्डरचा ओव्हरलोड झाल्यामुळे २४ तासांत परत ऑर्डर घेणे थांबविणार आहे.
स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ बुधवारी बाजारात आणला. या ‘३-जी’ स्मार्टफोनची किंमत केवळ २५१ रुपये आहे. आज सकाळपासून या स्मार्टफोनची बुकिंग ऑनलाइन सुरु करण्यात आली. मात्र, स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांनी कंपनीने दिलेल्या संकेतस्थळावर उड्या मारल्या आणि बघता-बघता प्रमणापेक्षा जास्त ऑर्डर आल्या. यामुऴे ओव्हलोड झाल्याने आता २४ तासात ऑर्डर घेण्याचे थांबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘फ्रीडम २५१’ हा फोन ४ इंचाचा क्यूएचडी डिसप्ले असून ९६० इनटू ५४० एवढे पिक्सल रिजोल्युशन आहे. याशिवाय क्वालकाम १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. अॅण्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित या हॅण्डसेटमध्ये ८ जीबीची इंटरनल स्टोरेज सुविधा असून मायक्रो एसडी कार्ड वापरून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकेल. यात ३.२ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. त्याचबरोबर १,४५० एमएएचची बॅटरी त्याला इंधन पुरवेल. या फोनमध्ये वूमेन सेफ्टी, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, व्हॉटस् अॅप, फेसबुक आणि यू ट्यूबसह अनेक अॅप्स इनबिल्ट असतील. फ्रीडम- २५१ साठी यापूर्वी कंपनीने सर्वात स्वस्त ४-जी स्मार्टफोन २,९९९ रुपयांत बाजारात उतरविला होता.