Join us

फेसबुकची वॉलमार्टवर मात

By admin | Updated: June 24, 2015 23:49 IST

शेअर बाजारातील भांडवलाच्या बाबतीत फेसबुकने आता वॉलमार्टलाही मागे टाकले आहे. स्टँडर्ड अँड पुअर्सच्या (एसअँडपी) ५00 कंपन्यांच्या निर्देशांकात

न्यूयॉर्क : शेअर बाजारातील भांडवलाच्या बाबतीत फेसबुकने आता वॉलमार्टलाही मागे टाकले आहे. स्टँडर्ड अँड पुअर्सच्या (एसअँडपी) ५00 कंपन्यांच्या निर्देशांकात टॉप-१0 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळविताना फेसबुकने वॉलमार्टला बाहेर फेकले आहे. सोमवारी फेसबुकने वॉलमार्टला मात दिली. त्यानंतर मंगळवारी दोन्ही कंपन्यांतील बाजार मूल्यांतील फरक वाढला. अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या कंपन्या यादीत सर्वोच्च स्थानी कायम आहेत. फेसबुक या कंपन्यांच्या जवळ जाऊन बसण्यासाठी जोरदार मार्गक्रमण करीत आहे. फॅक्टसेटच्या आकडेवारीनुसार, कालच्या व्यवसायादरम्यान फेसबुकचे बाजारमूल्य २३८ अब्ज डॉलर होते. फेसबुकचा समभाग ३.१४ डॉलरांनी अथवा ३.0७ टक्क्यांनी वाढून ८७.८८ डॉलर झाला. वॉलमार्टचे बाजारमूल्य २३४ अब्ज डॉलर आहे. वॉलमार्टचा समभाग २२ सेंटांनी घसरून ७२.५७ डॉलरवर आला. कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क येथे मुख्यालय असलेल्या फेसबुकने गेल्या वर्षी शेअर बाजारात मोठी भरारी घेतली. गेल्या वर्षभरात फेसबुकचा समभाग तब्बल ३४ टक्क्यांनी उसळला. त्या तुलनेत एसअँडपी-५00 निर्देशांक ८.२ टक्क्यांनीच वर चढला. फेसबुकच्या तिमाही निकालांनी अंदाजापेक्षा प्रचंड जास्त कामगिरी केली आहे.