उपायुक्तांच्या विरोधात ठराव घेणार? आज मनपाची विशेष सभा
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
अकोला : मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात निलंबनाचा ठराव घेण्यासाठी उद्या मंगळवारी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत ठराव पारित होतो किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपायुक्तांच्या विरोधात ठराव घेणार? आज मनपाची विशेष सभा
अकोला : मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात निलंबनाचा ठराव घेण्यासाठी उद्या मंगळवारी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत ठराव पारित होतो किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.येत्या १६ डिसेंबरपर्यंत मनपा हद्दीतील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी निर्देश दिले. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुकानांचे नामफलक काढण्याची मोहीम राबवली. या मुद्द्यावर जाब विचारण्यासाठी गेलेले ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव घेण्याचा निर्णय घेतला. उद्या २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या कामकाजाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.बॉक्स...बैठकांचे सत्र सुरूसत्ताधारी भाजपच्यावतीने सोमवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. त्यानंतर रात्री पुन्हा काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रदीर्घ बैठक सुरू होती. काँग्रेसच्यावतीने मनपात बैठक घेण्यात आली; परंतु ठोस निर्णय न झाल्याने उद्या सकाळी ९ वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना नगरसेवकांचे लक्ष भाजपच्या भूमिकेकडे आहे.बॉक्स....सकाळी ११.३० वाजता स्थगित सभामनपात २० नोव्हेंबर रोजी स्थगित केलेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. विषयसूचीवर ११ प्रस्ताव असून, त्यापैकी पाच प्रस्तावांना गतवेळी मान्यता दिली होती. उर्वरित सहा विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.