Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक्सची भारक्षमता वाढविण्यास उद्योजकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:50 IST

मालवाहतुकीच्या वाहनांची भार क्षमता वाढविण्याला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली.

मुंबई : मालवाहतुकीच्या वाहनांची भार क्षमता वाढविण्याला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे ट्रÑकवरील भारक्षमता चाके व अ‍ॅक्सेलनुसार सुमारे १५ ते २५ टक्के वाढेल, पण ज्येष्ठ आॅटोमोबाइल उद्योजक व सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंगचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी याला विरोध केला आहे.ते म्हणाले की, जलद मालवाहतुकीसाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल. आंतरराष्टÑीय स्तरावर होणाऱ्या मालवाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण सध्या रस्त्यावर धावणारी वाहने अतिरिक्त भार वाहून नेण्याच्या क्षमतेची नाहीत. त्यांची बनावट जुन्या पद्धतीची आहे. त्या वाहनांनी अतिरिक्त भार वाहून नेल्यास सुरक्षा धोक्यात येईल.