Join us  

Oppo लाँच करणार कमी बजेटमधील मोबाईल, 7GB रॅमसह अनेक फिचर, या दिवशी येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 4:06 PM

सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन आहेत, पण या स्मार्टफोनच्या किंमती १० हजारांच्या पुढे आहेत. काही फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतात पण यात काही फिचर मिळत नाहीत.

सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन आहेत, पण या स्मार्टफोनच्या किंमती १० हजारांच्या पुढे आहेत. काही फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतात पण यात काही फिचर मिळत नाहीत. पण आता Oppo A17k हा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. याआधी कंपनीने या सीरीजमध्ये Oppo A17 लाँच केला आहे. 

या Oppo मोबाईल फोनचे एकच मॉडेल लाँच करण्यात आला आहे, यात 3 GB RAM सह 64 GB इंटरनल स्टोरेज देखील आहे. या मॉडेलची किंमत 10,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे, हा मोबाईल नेव्ही ब्लू आणि गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. या किमतीत Oppo A17K ची स्पर्धा Redmi 10 Prime, Realme Narzo 50 आणि Moto E32 सारख्या स्मार्टफोनशी आहे.

5G सेवांमुळे 'अच्छे दिन'; दूरसंचार क्षेत्रात ३३% नोकऱ्या वाढल्या

या Oppo फोनमध्ये 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. तसेच वॉटरड्रॉप डिस्प्ले आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. MediaTek Helio G35 प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरला आहे, यात 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. या मोबाईलला 3 जीबी रॅम देण्यात आली आहे, पण हा हँडसेट 4 जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देतो, म्हणजेच या बजेट स्मार्टफोनमध्ये तुम्ही 7 जीबीपर्यंत रॅम मिळवू शकता.

टॅग्स :मोबाइलओप्पो