Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाईक रोड येथील गजानन मंदिरात प्रकट दिनोत्सव

By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST

नागपूर : नाईक रोड, महाल येथील श्री संत योगी गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनोत्सव कार्यक्रमांचे आयोजन श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे सोमवार, २९ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.

नागपूर : नाईक रोड, महाल येथील श्री संत योगी गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनोत्सव कार्यक्रमांचे आयोजन श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे सोमवार, २९ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.
उत्सवात महाराजांचे पट्टशिष्य पुंडलिक भोकरे, मुंडगांव यांना दिलेल्या प्रासादिक पादुका २९ रोजी दर्शनासाठी राहतील. आयोजन ४ मार्चपर्यंत होणार आहे. २९ रोजी सकाळी ६ वाजता कृष्णाबाई भजन मंडळाचे भूपाळी व काकडी आरती, ७ वाजता गजानन महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व आरती, दुपारी ३ वाजता श्रीचे पूजन, आरती, अखंड वीणा वादन आणि अक्षता वितरण, रात्री ७.३० वाजता अन्नपूर्णा भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, १ मार्चला अभिषेक व आरती, सकाळी ९ वाजता महाराजांच्या प्रतिमेची दिंडीसह मिरवणूक, श्रीची स्थापना, धार्मिक विधी, होमहवन, पूजन, आरती, दुपारी ३ वाजता सुरेशबुवा खापेकर यांचे कीर्तन, रात्री ७.३० वाजता माँ भगवती जागरण कार्यक्रम होणार आहे. याशिवाय २ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल तसेच ३ मार्चला कार्यक्रमांसह दुपारी ४ वाजता महाप्रसाद होणार आहे. ४ मार्चला संगीता गलांडे यांचे कीर्तन, स्वरवेद समूहाचा संगीतमय कार्यक्रम व रात्री १० वाजता प्रक्षाळ पूजा होणार आहे.