Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ झाली, तरच देश महासत्ता होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 02:58 IST

देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील, असे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अकोला : देशाला महासत्ता व्हायचे असेल, तर ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणावे लागतील, असे प्रतिपादन शुक्रवारी केंद्रीय जड वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३० वा दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती एकनाथ खडसे होते. इथिओपीयाचे माजी राजदूत टीबोर पी. नाझ (अमेरिका), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, कुुलसचिव ओमप्रकाश अग्रवाल, आदी व्यासापीठावर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. दाणी यांनी प्रास्ताविकात कृषी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाला शेतकरी समुपदेशन केंद्र देण्याची मागणी त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात कृषी अभ्यासक्रमाच्या १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट गुणांक प्राप्त करणाऱ्या विविध शाखेच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २७ सुवर्ण, १६ रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. २९ रोख व तीन पुस्तक स्वरुपात बक्षिसे यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)