Join us

‘२८ %चा टप्पा रद्द झाला, तरच जीएसटी होईल सुलभ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:37 IST

वस्तू व सेवा कराची (जीएसटी) व्यवस्था सहज व सोपी करायची असेल तर २८ टक्के कराचा सर्वोच्च टप्पा रद्द

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) व्यवस्था सहज व सोपी करायची असेल तर २८ टक्के कराचा सर्वोच्च टप्पा रद्द करणे तसेच उपकराचा एकच एक दर ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मावळते मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी केले आहे.वैयक्तिक कारण देऊन सुब्रमण्यन यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद सोडण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती. त्यांचा कार्यकाळ मे २०१९ ला संपत आहे. मुदतीच्या ११ महिने आधीच त्यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे.सुब्रमण्यन म्हणाले की, आदर्श व्यवस्थेत २८ टक्क्यांचा टप्पा रद्द व्हावा, असे मी म्हणालो. उपकर राहू शकतात. कारण काही वस्तूंवर आपल्याला अधिक कर हवा आहे. पण, येथेही एकापेक्षा अधिक दर असता कामा नये. माझ्या अहवालात मी करांचे १८ व ४० टक्के असे दोनच टप्पे सुचविले होते. ४० टक्के कराच्या अंमलबजावणीसाठी उपकरांचा वेगळा मार्ग असू शकतो.

टॅग्स :जीएसटी