Join us

केवळ २ दिवस बाकी, SBI ची 'ही' स्पेशल FD देतेय जबरदस्त व्याज; २ लाखांवर किती मिळणार व्याज?

By जयदीप दाभोळकर | Updated: March 29, 2025 15:35 IST

SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वेळोवेळी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक विशेष मुदत ठेव (FD) योजना आणत असते.

SBI Special FD Scheme: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वेळोवेळी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक विशेष मुदत ठेव (FD) योजना आणत असते. अशातच एसबीआय सध्या एसबीआय अमृत सृष्टी आणि अमृत कलश अशा दोन खास एफडी योजना राबवत आहे, ज्यावर चांगला परतावा मिळतोय. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे.

एसबीआय अमृत वृष्टी एफडी स्कीम

एसबीआयची 'अमृत सृष्टी' एफडी योजना १६ जुलै २०२४ रोजी सुरू करण्यात आली आणि त्यात गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. या योजनेत तुम्ही ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता. सर्वसाधारण ग्राहकांसाठी वार्षिक ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर ४४४ दिवसांनंतर म्हणजे मॅच्युरिटीनंतर ही रक्कम २,१८,५३२ रुपये होईल, म्हणजेच तुम्हाला १८,५३२ रुपये व्याज म्हणून मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना १,०९,९३६ रुपये मिळतील.

एसबीआय अमृत कलश एफडी स्कीम

एसबीआयच्या 'अमृत कलश' एफडी योजनेत तुम्ही ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता. ही योजना १२ एप्रिल २०२३ रोजी सुरू करण्यात आली. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. यामध्ये सामान्य ग्राहकांसाठी ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज दर दिला जातो. जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर ४०० दिवसांनंतर म्हणजे मॅच्युरिटीनंतर ही रक्कम २,१५,५६२ रुपये होईल, म्हणजेच तुम्हाला १५,५६२ रुपये व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटीवर २,१६,६५८ रुपये मिळणार आहेत. 

कशी कराल गुंतवणूक?

एसबीआयच्या या २ खास एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही २ मार्ग वापरू शकता. आपल्याला आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या एसबीआय शाखेत जावं लागेल. याशिवाय जर तुमचे एसबीआयमध्ये खातं असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा एसबीआयच्या योनो अॅपद्वारे ऑनलाइन गुंतवणूक करू शकता.

टॅग्स :एसबीआयगुंतवणूक