Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढ रोखण्यासाठी कांदा आयात करणार

By admin | Updated: June 28, 2015 21:18 IST

भाववाढ रोखण्यास देशांतर्गत कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून कांद्याची आयात करण्याबाबत सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : भाववाढ रोखण्यास देशांतर्गत कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून कांद्याची आयात करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. मागच्या वर्षभरात महानगरात कांद्याचे भाव ४० टक्क्यांनी वाढले आहेत. कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या नाशिकसह अन्य मुख्य राज्यातील चाळीत साठविण्यात आलेल्या कांद्याचे नुकसान होत असल्याचे चांगल्या प्रतीचा कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढत आहेत.कांदा आयात करण्याच्या मुद्यावर मागच्या आठवड्यात सचिवांच्या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या समितीने वाणिज्य मंत्रालयालाही या प्रस्तावावर विचार करण्याची शिफारसही केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरातेत झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील कांद्याचे नुकसान झाले होते. गेल्या महिनाभरात लासलगावात (महाराष्ट्र) कांद्याचा घाऊक बाजारातील भाव ११ रुपयांवरून प्रति किलो १६ ते १७ रुपयांवर गेला आहे. भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने मागच्या वर्षीही कांदा आयात केला होता. मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या साठवणीमुळे पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे.