Join us  

कांद्याने शेतकऱ्यांचा केला वांदा, खर्चही निघत नसल्याने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:07 AM

रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे.

नाशिक : रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. कोलमडलेल्या बाजार भावाने शेतकºयांना अक्षरश: रडविले आहे. कांदा २०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल रु पये तर गोलटी (छोट्या आकाराचा) अवघा १०० ते २५० रु. प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दुप्पट भाव शेतकºयांना मिळेल आणि त्यात सरकार ५० टक्के रक्कम टाकून शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते, परंतु या आश्वासनांचा आता सरकारला विसर पडल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.दुप्पट रक्कम तर दूरच मात्र, भांडवलसुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने अनेक वेळा कांद्यावरील निर्यात मूल्य शून्य केले, अनेक कर हटविले, तरीदेखील बाजारेभाव सुधारत नाही. शहरातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून बाजार भाववाढू दिला जात नसल्याची तक्र ार शेतकरी करत आहे, असा आरोप पिंपळसचे शेतकरी दर्शन केंगे यांनी केला आहे.खरीप हंगामातील लाल कांद्याला थोडा-फार चांगला भाव मिळाल्याने, उन्हाळी कांद्याची महागडी बियाणे व रोपे खरेदी करून शेतकºयांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली होती. त्यात यंदा अति प्रमाणात थंडी आणि धुके असल्याने कांदा पिकविण्यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला होता.>देशाच्या एकूण गरजेच्या तुलनेत कांदा पिकविणाºया राज्यांची संख्या खूप कमी आहे. सरकारी अनास्था, वाढता वाहतूक खर्च, वाढत्या तेलाच्या किमती, यामुळे कांदा उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या होत असलेल्या नुकसानीला सरकारची ध्येयधोरणे कारणीभूत आहेत. - गोकुळ गीते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती>कांद्याच्या भावात झालेली घसरण (प्रति क्विंटल)फेब्रुवारी- १२०० ते १५०० रु .मार्च- १००० ते १२०० रु .एप्रिल- ७०० ते १००० रु .मे- ४०० ते ६५० रु .

टॅग्स :कांदा